Breaking News

चांभार्लीतील रेगे हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाची सुविधा

मोहोपाडा ः प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून शासनाकडून खासगी रुग्णालयांमधूनही लसीकरण मोहीम सुरू आहे. खालापूर तालुक्यातील वासांबे मोहोपाडा विभागात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असल्याचे दिसून येते. आसपासच्या परिसरातील नागरिकांना कोरोना लसीकरण सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी चांभार्ली येथील संपूर्ण रेगे हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाची सुविधा मंगळवारपासून (दि. 23) सुरू होणार असल्याचे रेगे हॉस्पिटलचे संचालक डॉ. रविराज जाधव यांनी सांगितले.डोस घेण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 अशी असणार आहे. या वेळी लसीकरणासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पेन्शन बुक यापैकी एक ओळखपत्र व स्वतःचा अथवा घरातील एका व्यक्तीच्या मोबाइल नंबरची आवश्यकता आहे. कोरोना लसीकरण 60 वर्षांपुढील सर्व व्यक्तींसाठी, तर 45 ते 59 वर्ष वयोगटातील ज्या व्यक्तींना प्रतिकारशक्ती कमी करणार्‍या व्याधी आहेत अशा व्यक्ती तसेच कोविड वॉरियर्स यांना लाभ घेता येईल. लसीकरण शुल्क 250 रुपये प्रतिव्यक्ती असणार आहे.तरी नागरिकांनी www.cowin.gov.in नोंदणी करून कोरोना लसीकरण करून घ्यावे, अथवा  8926162616/8888380000 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. रविराज जाधव यांनी केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply