Breaking News

खानाव येथे मोफत आधार कार्ड शिबिराचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष चिंध्रण पंचायत समितीच्या वतीने भारतीय पोस्ट आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील खानाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट दिली. या वेळी उपसरपंच बाळाराम पाटील, चंदा वारदे, पुंडलीक तवले, एकनाथ फराड, दत्तात्रेय दारदे, बळीराम भोईर, गणेश तातरे, विजय पाटील, निलेश वारदे, रमेश वारदे, प्रकाश जाधव, रोशन फराड, अशोक कर्णुक, रवि पाटील, बाबुराव तोडेकर आदी उपस्थित होते. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply