Breaking News

ठाकरे सरकारची अवस्था कन्फ्युजन ही कन्फ्युजन है!

मुंबई ः प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भावाचा अटकाव करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या नावाखाली राज्य सरकारने लॉकडाऊन लावत जनतेची घोर फसवणूक केली आहे. रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्पर विरोधी विधाने पाहता राज्य सरकारची परिस्थिती कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं, अशी झाली असल्याचा टोला भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. ते बुधवारी (दि. 7) भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
या वेळी उपाध्ये यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली. राज्यात कठोर निर्बंध लावले जाणार असून, केवळ आठवड्याच्या अखेरीस शनिवारी, रविवारी पूर्ण लॉकडाऊन असेल, असे मुख्यमंत्री, तसेच सरकारमधील चार-चार मंत्र्यांनी विविध वृत्तवाहिन्यांवर सांगितले होते. जनतेच्या हिताचा सारासार विचार करून हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले होते, मात्र मंगळवारी राज्यभरातील गोंधळाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने विरोधी पक्षांसह जनतेचीसुद्धा फसवणूक केल्याचे दिसून आले.
पोलीस आणि शासकीय अधिकार्‍यांच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठा, दुकाने बंद केल्या जात असल्याचे चित्र पहायला मिळते. महाविकास आघाडी सरकारला कठोर निर्बंध लावायचे आहेत की लॉकडाऊन? राज्यावरील हे संकट टाळण्यासाठी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सरकारला साथ देण्यास भाजप तयार आहे, पण सरकारने सामान्य, गोरगरीब, कष्टकरीवर्गाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
त्यासाठी सरकारने या वर्गाला आर्थिक मदत द्यावी, असे भाजपने सूचविले होते, मात्र रविवारी आपला निर्णय जाहीर करून मुख्यमंत्री ‘मातोश्री’त बसले आहेत. या संकटकाळात जनतेचे काय हा साधा प्रश्नही त्यांना पडत नसावा काय? सरकार एवढे निर्दयी कसे असू शकते?, असा सवाल उपाध्ये यांनी या वेळी उपस्थित केला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply