Breaking News

सचिन वाझेंची अजून काहीतरी मोठे करण्याची योजना होती : एनआयए

मुंबई ः प्रतिनिधी
सचिन वाझे प्रकरणातून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. ‘अँटिलिया’बाहेर स्फोटके ठेवल्यानंतरदेखील वाझे अजून काहीतरी मोठे करण्याचे नियोजन करीत होते, अशी माहिती एनआयएतील सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाझेंची 23 एप्रिलपर्यंत न्यायालयात रवानगी करण्यात आली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर आढळलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सचिन वाझेंची सध्या एनआयएकडून चौकशी सुरू आहे. वाझे यांच्या एनआयए कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना शुक्रवारी (दि. 9) न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी त्यांची 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. यासोबतच एनआयए न्यायालयाने त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे हाताळण्याची परवानगी सीबीआयला दिली आहे.
परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका पत्राच्या माध्यमातून आरोप केले होते. त्यावर न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर अखेर देशमुख यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता सचिन वाझे यांनीदेखील एक पत्र एनआयएच्या कोठडीत असताना लिहिले आहे. त्यामध्ये देशमुख यांच्यासोबतच राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply