Breaking News

प्रत्येक संघासोबत असणार एक अ‍ॅण्टी करप्शन अधिकारी

मुंबई : प्रतिनिधी

इंग्लंडमधला आगामी क्रिकेट विश्वचषकासाठी आयसीसीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विश्वचषक अधिक पारदर्शकपणे पार पडण्यासाठी सर्व 10 संघासोबत आयसीसीकडून एक अ‍ॅण्टी करप्शन अधिकारी नेमण्यात येणार आहे. प्रत्येक संघाला स्वतंत्र भ्रष्टाचारविरोधी अधिकारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आयसीसीच्या आजवरच्या कार्यपद्धतीनुसार विश्वचषक सामन्यांच्या शहरात एकेक अ‍ॅण्टी करप्शन अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात येत असे, पण आगामी विश्वचषकापासून प्रत्येक संघावर नजर ठेवण्यासाठी सराव सामन्यांपासून त्या संघाच्या विश्वचषकातल्या अखेरच्या सामन्यापर्यंत, एकच अधिकारी त्या संघासोबत राहणार असल्याचं आयसीसीकडून सांगण्यात आलं आहे.

याआधी आयसीसीचं भ्रष्टाचारविरोधी युनिट सामन्याच्या स्थळी हजर राहत होतं. यामुळे संघाला अनेक अधिकार्‍यांच्या संपर्कात राहावं लागत होतं, परंतु आता प्रत्येक संघासोबत एका अधिकार्‍याची नियुक्ती केली असून, सराव सामन्यापासून स्पर्धा संपेपर्यंत संघासोबतच राहील. डेली टेलिग्राफच्या वृत्तानुसार, आयसीसीने नियुक्त केलेल्या अधिकार्‍याचा मुक्कामही त्या त्या संघाच्या हॉटेलमध्येच राहिल. विश्वचषकाला भ्रष्टाचार आणि फिक्सिंगपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आयसीसीने ठोस पाऊल उचललं आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply