Breaking News

रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून पेण नगर परिषदेस रुग्णवाहिका समर्पित

पेण : प्रतिनिधी

कोरोना काळातील जनतेची गरज ओळखून आमदार रविशेठ पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीतून पेण नगर परिषदेस ऑक्सिजनरहीत व वातानुकुलीत रुग्णवाहिका समर्पित केली.

लॉकडाऊन काळात रुग्णांची ससेहोलपट होत असून, त्यांना वेळेवर औषोधोपचारही मिळत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. राज्य शासनाने वैद्यकीय सेवेकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी या वेळी व्यक्त केले.

पेणमधील शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यात आली, मात्र ते  हाताळण्यासाठी तज्ज्ञ नसल्यामुळे ती यंत्रणा तशीच पडून आहे. नुसता लॉकडाऊन करून प्रश्न सुटणार नाहीत, जनतेला वैद्यकीय सेवा तात्काळ पुरविणे ही राज्य शासनची जबाबदारी आहे, असे नगराध्यक्षा पाटील यांनी सांगितले.

या रुग्णवाहिका लोकार्पण सोहोळ्यास आमदार रविशेठ पाटील, उपनगराध्यक्षा वैशाली कडू, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, शहर अध्यक्ष हिमांशु कोठारी, नगर परिषद सभापती दर्शन बाफणा, तेजस्वीनी नेने, नगरसेविका देवता साकोस्कर, आश्विनी शहा, जिल्हा परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील,  भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रविकांत म्हात्रे, मितेश शहा, शाकीब मुजावर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply