Breaking News

अवैध दारू विक्रीप्रकरणी भाजयुमो आक्रमक

कामोठ्यातील हुक्का पार्लर, गुठखा, गांजा विक्रीवर कारवाई करा

कामोठे : रामप्रहर वृत्त

कामोठ्यामधील अवैध दारू विक्रीप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) पदाधिकार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येथील बेकायदेशीर हुक्का पार्लर, गुठखा, गांजा व दारू विक्रीवर कारवाई करण्याची मागणी या पदाधिकार्‍यांनी केली आहे. यासंदर्भात कामोठे पोलीस स्टेशन, पुरवठा विभाग तहसील तसेच पुरवठा विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे पत्र व्यवहार केला आहे. लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

कामोठे शहरात हुक्का पार्लर (उपहारगृह कॅफे) या सर्व कॅफेसमोर व शेजारी काही शाळा व रूग्णालय आहेत. हे बेकायदेशीर हुक्का/शीशाची विक्री करीत आहे. त्याद्वारे नियम आणि कायद्यांचे पालन करीत नाही, गाडी उभी करण्यास मनाई असलेल्या जागांवर पार्क होतात. अल्पवयीन तसेच युवक हे याकडे आकर्षित होतात व वाइट व्यसनाच्या आहारी जातात आदी अशा अनेक तक्रारी आमच्याकडे स्थानिक नागरिकांकडून व वाहतुक दारांकडून आल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी आमच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी (दि. 11 मार्च) सायंकाळी 8 वाजता च्या सुमारास त्या हुक्का पार्लर (उपहारगृह कॅफे) चा आढावा घेतला.

त्यामुळे निदर्शनास आले की, या उपहारगृहात बेकायदेशीर ‘हुक्का/शीशाची’ विक्री सुरू आहे. या उपहारगृहाला फक्त पॅकेज केलेले अन्न विकायची परवानगी असताना हे कायद्यांचा उल्लंघन करून स्वयंपाकघर सुध्दा चालवत आहेत, असे कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

कामोठ्यातील पान टपरीवर अवैध पध्दतीने गुटखा तसेच गांजा या अंमली पदार्थांची विक्री सर्रासपणे चालू आहे. या संदर्भात कामोठे पोलीस स्टेशन, पुरवठा विभाग तहसील तसेच पुरवठा विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे पत्र व्यवहार करण्यात आला आहे. या विषयाची गंभीर दखल घ्यावी व त्वरित बेकायदेशीर ‘हुक्का/शीशाची’ विक्री बंद करावी तसेच मालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला भाजप युवा मोर्चातर्फे आंदोलन करत उपहारगृह बंद करावे लागेल. तेव्हा जी परिस्थिती उद्भवेल त्यास कायदा व सुव्यवस्थेस आपले प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.

कामोठ पोलिसांना निवेदन देते वेळी कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले, सागर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply