Wednesday , February 8 2023
Breaking News

द्रुतगती मार्गावर टेम्पोच्या अपघातात चालक जागीच ठार

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी : वेगात असलेल्या टेम्पोची पुढे असलेल्या वाहनाला जोरदार धङक बसून झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी (दि. 12) पहाटे घङली आहे. टेम्पो (एमएच-12, क्यूङब्लू-9385) मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. खालापूर तालुक्यातील खरसुंङी गावानजीक   चालक सभाजित रामप्रसाद पाल (वय 29) याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटून, पुढे असलेल्या अज्ञात वाहनाला जोरदार धङक बसली. या अपघातात टेम्पोच्या पुढील भागाचा चक्काचूर होऊन चालक सभाजित गंभीर जखमी होऊन अङकून पङला होता. अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पथक, वाहतूक पोलीस, अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी पथक घटनास्थळी पोहचले. गंभीर जखमी चालक सभाजितचा टेम्पोत अङकूनच मृत्यू झाला. अपघाताची माहिती खालापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply