पनवेल : तळोजा एमआयडीसीत असलेल्या कंपन्यांचे प्रदूषणयुक्त सांडपाणी खारघरमध्ये येत असल्याने येथील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. असे असताना तळोजा एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यावर उपाययोजना करताना दिसत नाहीत. त्याच्या निषेधार्थ पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या पुढाकाराने खारघरमध्ये रविवारी (दि. 27) सेक्टर 10 प्रदूषणविरोधी समितीच्या वतीने निषेध रॅली आयोजित करण्यात आली होती. महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही या रॅलीत सहभागी होत निषेध व्यक्त केला. तळोजा एमआयडीसीतील कंपन्यांमधून खारघरलगत असणार्या खाडीमध्ये घातक व विषारी रसायने सोडली जात आहेत. पाण्याबरोबरच खारघरची हवादेखील प्रदुषित झाली आहे, मात्र तळोजा एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यावर उपाययोजना करताना दिसत नाहीत. त्याच्या निषेधार्थ सकाळी साडेनऊ वाजता बँक ऑफ इंडिया येथून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी सभापती नरेश ठाकूर यांच्यासह भाजप खारघर शहर सरचिटणीस कीर्ती नवघरे, अमर उपाध्याय, आरती नवघरे, दिलीप जाधव, गीता चौधरी, बीना गोगरी, नितीन पालकर, सुरेश ठाकूर, मीरा घुगे, अॅड. नेहा यादव, सुषमा शुक्ला, प्रज्ञा जैन, श्रृती नेमा, गुरूनाथ तोडकर, पूजा काटेकर, सविता, सत्यपाल चुग, अरविंद जैन, जे. एन. झा, सोनावण, मोहनसिंग बिस्ट, विलास सावंत, जयकुमार पांडे, संजय सायगावकर, तुकाराम घोडके, नीलकमल शर्मा, अर्पणा मट्टा, दिलीप पांचाळ, नामदेव इंगळे, कैलास राव, राजीव दुबे, देवेंद्र यादव, मनोज नेमा, नितीन पागेराट यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीचा समारोप लिटिल वर्ल्ड मॉल येथे करण्यात आला. प्रदूषणामुळे खारघरमधील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करावी; अन्यथा आम्हाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा या वेळी नरेश ठाकूर यांनी दिला. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर पर्यावरणमंत्र्यांपर्यंत हा विषय घेऊन जाऊ, असेही त्यांनी सांगितले.
Check Also
जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक
आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …