Breaking News

उरण एसटी स्थानकात बसेसची सफाई

गाड्या रद्द; अत्यावश्यक सेवांच्या प्रवाशांचीच वाहतूक

उरण : वार्ताहर

कोरोना विषाणूमुळे पुन्हा हाहाकार माजला असून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे उरणच्या एसटी डेपोमध्ये ठाणे, दादर, पनवेल अथवा बाहेरून उरण स्थानकात एसटी आल्यावर सॅनिटाईझ करण्यात येते. कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्याअगोदर उरण आगारातून सुमारे 30 गाड्या सुरू होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गाड्या कमी करण्यात आल्या. काही महिन्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला. त्यामुळे परत गाड्या सुरू करण्यात आल्या, परंतु गेल्या महिन्यापासून कोरोनाने उसंडी मारल्याने पुन्हा उरण स्थानकातून बाहेर जाणार्‍या व उरण तालुक्यातील ग्रामीण भागात जाणार्‍या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. फक्त अत्यावशक सेवा व वैद्यकीय कामासाठी जाणार्‍या रुग्णांसाठी आठ गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

ठाणे, दादर, पनवेल अथवा बाहेरून उरण स्थानकात एसटी आल्यावर सॅनिटाईझ करण्यात येते. फक्त अत्यावशक सेवा व आजारी रुग्ण यांच्यासाठी गाड्यांची सोय करण्यात आली आहे. आजारी रुग्णाचे आजारी असल्याची कागदपत्रे तपासूनच गाडीत प्रवेश दिला जातो. त्याचप्रमाणे कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. अत्यावश्यक कामांसाठी फक्त आठ गाड्या सोडल्या जात आहेत.

-सतीश मालचे, आगार व्यवस्थापक, उरण

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply