पनवेल : तालुक्यात राम नवमी शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त ठिकठिकाणी राममंदिरांमध्ये सत्यनारायण पूजेचे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत प्रभु रामाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, वसंतशेठ पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, कामगार आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र घरत, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …