Breaking News

सिंधू उपांत्य फेरीत

सिंगापूर : वृत्तसंस्था

संघर्षपूर्ण लढतीनंतर भारताच्या पी. व्ही. सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे, मात्र सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांना पराभवाचा धक्का बसला.

जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 18व्या स्थानी असलेल्या आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेच्या कांस्यपदक विजेत्या चीनच्या काइ यानयानला पराभूत करण्यासाठी सिंधूला तीन गेमपर्यंत संघर्ष करावा लागला. सिंधूने इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेनंतर यंदाच्या वर्षी दुसर्‍यांदा सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

सिंधूने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यानयानला पहिल्या गेममध्ये 5-5 अशा बरोबरीनंतर पिछाडीवर टाकत पहिला गेम 21-13 असा जिंकला. दुसर्‍या गेममध्ये मात्र यानयानने सिंधूला मध्यंतराला 11-6 असे पिछाडीवर टाकले. अखेरीस सिंधूला हा गेम 17-21 असा गमवावा लागला. तिसर्‍या गेममध्ये मात्र सिंधूने यानयानला अजिबात संधी न देता 21-14 असा जिंकत सामना खिशात घातला.उपांत्य फेरीत सिंधू आणि ओकुहारात झुंज होणार आहे.

जपानच्या द्वितीय मानांकित नोझोमी ओकुहाराने सहाव्या मानांकित सायनाला 21-8, 21-13 असे अवघ्या 36 मिनिटांत सहज पराभूत केले.

पुरुष एकेरीत भारताच्या श्रीकांतला अव्वल मानांकित केंटो मोमोटाशी संघर्षपूर्ण सामन्यानंतर पराभव पत्करावा लागला. मोमोटाविरुद्ध हा  त्याचा नववा पराभव ठरला. या सामन्यातील पहिला गेम मोमोटाने 21-18 असा जिंकला. त्यानंतर दुसर्‍या गेममध्ये श्रीकांतने दमदार खेळाचे प्रदर्शन घडवत तो गेम 21-19 असा जिंकला.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply