Breaking News

वीटभट्टीवरील शाळेतील विद्यार्थ्यांना उबदार कपडे आणि खाऊचे वाटप

कर्जत : बातमीदार

नेरळजवळील दामत गावातील वीटभट्टीवरील आदिवासी मुलांच्या शाळेतील 33 विद्यार्थ्यांना कर्जतचे व्यापारी किरण परमार यांनी उबदार कपडे आणि खाऊचे वाटप केले.

नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारी भाविका जामघरे हिने दामत येथील आठ वीटभट्टीवर काम करणार्‍या स्थलांतरित आदिवासी कातकरी समाजाच्या मुलांसाठी शाळा सुरु केली आहे. या शाळेची माहिती सोशल मीडियावर प्रसारीत झाल्यानंतर किरण परमार यांनी दामत येथील वीटभट्टीवरील शाळेत जाऊन तेथील पहिली ते सातवीच्या 33 मुलांना भेटवस्तू, उबदार कपडे आणि खाऊचे वाटप केले. यावेळी संतोष पेरणे, किशोर गायकवाड आणि भगवान जामघरे उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply