सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेलची ओळख असणार्या वडाळे तलाव सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कामाची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 1) पाहणी केली आणि अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
या वेळी नगरसेवक नितीन पाटील, सिव्हिल इंजिनिअर मंदार नाडगौडी, आर्किटेक्ट अमृता गांधी, उमेश इनामदार, चिन्मय समेळ उपस्थित होते.