Breaking News

कोविड हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर

कोविड सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलांना कोविड आयसीयु विभागात सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी क्रांतीज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा रुपाली शिंदे यांनी निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे व प्रांताधिकार्‍यांकडे केली आहे. या निवेदनात रुपाली शिंदे यांनी म्हटले आहे की, कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेमुळे रुग्णांसाठी बेड, रेमडेसिवीर, ऑक्सिजन व औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना मोठ्या प्रमाणात आपल्या घरच्या व्यक्तींना वाचविण्यासाठी पळापळ धावपळ सुरू आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, कोविड प्लाझ्मा व रेमडेसिवीर उपलब्ध न झाल्याने, अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. यामुळे कोविड आयसीयु विभागात कश्या प्रकारे कोरोनावर उपचार करण्यात येतात याची माहिती आता नागरिकांना, हॉस्पिटलमध्ये येणार्‍या रुग्णांच्या नातेवाइकांना असणे गरजेचे आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना त्यांना भेटता येत नाही, त्यांना आपल्या रुग्णास पाहताही येत नाही. आपला रुग्ण बरा आहे कि कसा आहे, याची नातेवाइकांना खबर नसते. 20-20 दिवस कोरोनावर उपचार करून तरीदेखील रुग्ण आपला प्राण सोडत आहे,  का आणि कशामुळे? हे जाणून घेणे अंत्यत गरजेचे आहे. त्यामुळे कोविड हॉस्पिटलांमध्ये आयसीयु विभागात सीसी टीव्ही कॅमेरा त्वरित लावावा, जेणेकरून आत चाललेल्या घडामोडी रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेर लावलेल्या टीव्हीवर पाहता येतील आपला रुग्ण बरा आहे की नाही, त्याची प्रकृती ढासळत चाली आहे का, याविषयी नातेवाइकांना माहिती होईल. याकडे गांभीर्याने बघून लवकरात लवकर हॉस्पिटलांना सीसीटीव्हीची सोय करावी, हे आदेश द्यावेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply