Breaking News

माँ वैष्णोदेवी मित्र मंडळाकडून गरिबांना अन्नदान

उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली माँ वैष्णोदेवी मित्र मंडळ उरण यांच्या वतीने  उरण तालुक्यातील नवघर, पागोटे जवळील झोपडपट्टीतील सुमारे 300 गरीब गरजूंना बुधवारी (दि. 8) अन्नदान करण्यात आले, अशी माहिती माँ वैष्णोदेवी मित्र मंडळाचे सेक्रेटरी दिनेश सिंह यांनी सांगितले.

माँ वैष्णोदेवी मित्र मंडळाचे सर्व सदस्यांनी एकत्र येऊन स्वतः खाद्यपदार्थ बनविले, पॅकिंग केले व गरीब-गरजू लोकांना झोपडपट्टीत जाऊन स्वतः दिले. या वेळी माँ वैष्णोदेवी मित्र मंडळचे सेक्रेटरी दिनेश सिंह, बाबुलाल वर्मा, प्रभुनाथ सिंह, भगवती शर्मा, सुंदर यादव, ललित सिंह, अनिल गुप्ता, बेचन परदेशी, मुन्शी यादव, राजेश यादव, सन्नी गुप्ता, असलाम सहा, जितू गिरी, धर्मराज गोडसे, तुफानी सरोज, सदस्य आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने हातावर पोट असलेल्या गरीब गरजू लोकांना काम मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना मदतीचा हात देणे सर्वांचे कर्तव्य आहे. प्रसंगाला मदत करणे म्हणजेच भुकेल्यांना घास देणे  आपले कर्त्यव होते, अशी प्रतिक्रिया माँ वैष्णोदेवी मित्र मंडळचे सेक्रेटरी दिनेश सिंह यांनी व्यक्त केली.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply