Breaking News

चिंचवणमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यातून पनवेल तालुक्यातील आणि उरण मतदारसंघातील चिंचवण गावात सुमारे एक कोटी 23 लाख रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 20) झाले.
पनवेल आणि उरण मतदारसंघांमध्ये भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे सुरू होत आहेत. या अंतर्गत चिंचवण गावात आमदार महेश बालदी यांच्या 30 लाख रुपयांच्या जिल्हा नियोजन विकास निधीमधून चिंचवली स्टॉप ते चिंचवण गावापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील हर घर नल हर घर जल अंतर्गत 93 लाख रुपयांची जलजीवन मिशन योजना मंजूर झाली आहे. या दोन्ही विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमांना सरपंच पद्माकर कातकरी, उपसरपंच वसंत पाटील, सदस्य सुवर्णा पाटील, सदस्य शरद वांगिलकर, संतोष पारधी, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, गिरवलेचे माजी सरपंच आत्माराम हातमोडे, दत्तात्रेय हातमोडे, माजी सदस्य शाम ठोंबरे, भास्कर पाटील, चंद्रकांत पाटील, केशव ठोंबरे, परशुराम पाटील, संभाजी म्हात्रे, काशिनाथ खुटले, भाऊ पोपटा, अनंत पोपेटा, संभाजी म्हात्रे, महेंद्र पाटील, राजेश घरत, निलेश वांगिलकर, युवा कार्यकर्ते परेश ठोंबरे, माजी सदस्य जगदीश पाटील, अमित पाटील, संजय पोपेटा, संजय पाटील, वसंत ठोंबरे, काशिनाथ ठोंबरे, बबन कातकरी, सुनील कातकरी, विष्णू घरत, बाळकृष्ण ठोंबरे, मारुती घरत, चंद्रकांत ठोंबरे, सुरेश चोरघे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply