पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोना वैश्विक महामारीच्या लढाईत नागरिकांना मदत करणारे उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी त्यांच्या स्थानिक आमदार कार्यक्रम निधीतून चौक ग्रामीण रुग्णालयाला कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य पुरवठा करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे.
सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरिता स्थानिक आमदार विकास कार्यक्रमांतर्गत आमदार महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील चौक रुग्णालयाला कोविड-19संदर्भात वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य पुरवठा करण्यासाठी त्यांच्या आमदार निधीतून 50 लाख रुपयांचा निधी देण्याच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकार्यांना पत्र दिले आहे. या निधीमुळे त्याचा मोठा फायदा चौक परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी होणार आहे.
यापूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांनीही त्यांच्या स्थानिक आमदार कार्यक्रम निधीतून कामोठे एमजीएम हॉस्पिटलमधील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य पुरवठा उपलब्ध करण्यासाठी पनवेल महापालिकेला एक कोटी सात लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …