पनवेल ः वार्ताहर
पनवेल-सायन महामार्गावर पनवेलहून बेलापूरकडे जाणार्या रिक्षेमधील आमरसाने भरलेली अंदाजे पाच ते दहा किलो वजनाची पिशवी रस्त्यावर पडल्याने आमरस रस्त्यावर सांडला. या आमरसामुळे जवळपास पाच ते सहा वाहने घसरल्याने काही काळ पनवेल-सायन महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे ब्रिजवर पाच ते सहा वाहने घसरून पडली. हा प्रकार ऑइलच्या गळतीमुळे झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र रस्त्यावर आमरस सांडल्याचे वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत वाहतूक पोलिसांना कळवण्यात आली होती.
या वेळी कळंबोली वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी दाखल होत सदर ठिकाणी माती टाकून वाहतूक सुरळीत केली होती.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper