Breaking News

तळोजा रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्ग पूर्णपणे खुला भाजपच्या आंदोलनाला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या इशार्‍यानंतर तळोजा येथील रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने केलेल्या आंदोलनाला यश आले असून, नागरिकांनी आभार मानले आहेत.
तळोजा रेल्वे फाटकाजवळ वाहनचालकांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दिवा-पनवेल मार्गावर अनेक वेळा एकामागोमाग रेल्वेगाड्या मार्गक्रमण करीत असल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागत असतात. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्यात आला असून, त्यानंतर उद्भवलेल्या समस्यांसंदर्भात दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले, पण प्रचंड वाहतूक कोंडी होऊनसुद्धा हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलनाद्वारे हा मार्ग खुला करण्याचा इशारा नगरसेवक हरेश केणी तसेच प्रल्हाद केणी, निर्दोश केणी, दिनेश केणी आणि विविध संघटनांनी दिला होता, मात्र मुजोर अधिकार्‍यांनी याबाबत कार्यवाही न केल्याने गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाच्या दणक्याने सिडको अधिकार्‍यांनी नमते घेत चाचणीच्या स्वरूपात एक लेनची वाहतूक सुरू केली आणि संपूर्ण भुयारी मार्ग सोमवारपासून खुला करणार असल्याचे आश्वासन दिले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी हा मार्ग पूर्णपणे खुला न केल्यास तर आम्ही रेल्वे ट्रॅकवर जाऊन आंदोलन करू, असा इशारा दिला होता. त्याची दखल घेत भुयारी मार्ग पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या भाजपच्या आंदोलनाला यश आले असून, नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे.
या वेळी उपमहापौर जगदिश गायकवाड, नगरसेवक हरेश केणी, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती अनिता पाटील, प्रल्हाद केणी, निर्दोश केणी, विनोद घरत, नंदकुमार म्हात्रे, आशा बोरसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply