नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघ पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बांगलादेशला जाणार आहे. भारतीय संघ बांगलादेश दौर्यात दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. 2019मध्ये या दोन्ही देशांमध्ये शेवटची कसोटी मालिका खेळली गेली होती. यात कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पिंक बॉल टेस्ट सामन्याचादेखील समावेश होता. इसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या अहवालात असेही म्हटले आहे की, बांगलादेश क्रिकेट बोर्ड 2021 ते 2023दरम्यान होणार्या मालिकेचे प्रसारण हक्क विकत आहे. काही मोठे संघ बांगलादेशात जाणार आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलिया संघाचे नाव आहे. ऑस्ट्रेलियन संघाला तेथे मर्यादित षटकांच्या मालिका खेळाव्या लागतील. इंग्लंडच्या संघालाही बांगलादेशमध्ये टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठीही जावे लागणार आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघदेखील जानेवारी 2023मध्ये बांगलादेश दौर्यावर जाणार आहेत. शेवटच्या वेळी भारतीय संघ बांगलादेशात खेळायला गेला होता तेव्हा त्यांची कामगिरी काही खास नव्हती. बांगलादेशने वनडे मालिकेत भारतीय संघाचा पराभव केला होता. बांगलादेशची टीम सध्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी तयारी करीत आहे. श्रीलंकेचा संघ बांगलादेशमध्ये पोहचला आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …