
पनवेल ः भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी जवाद मुकीद काझी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी नगरसेवक मनोहर म्हात्रे, हरेश केणी, मुकीद काझी, अल्पसंख्याक मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष जसीम गॅस उपस्थित होते.