Breaking News

अ‍ॅशेस मालिकेची घोषणा; इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया भिडणार

सिडनी ः वृत्तसंस्था
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणार्‍या बहुचर्चित अ‍ॅशेस मालिकेचे वेळापत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे. अ‍ॅशेस मालिका 8 डिसेंबरपासून सुरू होणार असून, सामने पर्थ, ब्रिस्बेन, अ‍ॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे होतील.
पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाईल. त्याशिवाय 26 वर्षांत प्रथमच अंतिम सामना सिडनीऐवजी पर्थ येथे खेळला जाईल. या वेळी मालिकेचा चौथा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर, तर अंतिम सामना पर्थ येथे होणार आहे.

असे आहे वेळापत्रक

  • पहिली कसोटी-गाबा, ब्रिस्बेन (8 ते 12 डिसेंबर, 2021)
  • दुसरी कसोटी -अ‍ॅडलेड ओव्हल, डे-नाईट (16 ते 20 डिसेंबर 2021)
  • तिसरी कसोटी-मेलबर्न (26 ते 30 डिसेंबर 2021)
  • चौथी कसोटी-सिडनी (5 ते 9 जानेवारी 2022)
  • पाचवी कसोटी-पर्थ (14 ते 18 जानेवारी 2022)

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply