Breaking News

मॅक्रो आणि मायक्रो कंटेन्मेंटमध्ये आरटीपीसीआर चाचण्या वाढविणार

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये ट्रेसिंग टेस्टींग आणि ट्रिटमेंटवर भर देण्यात येत आहे. यानुसार मॅक्रो आणि मायक्रो कंटेन्मेंटमध्ये आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यात येणार असून येथील सर्व नागरिकांना या आदेशाचे पालन करणे बंधनकारक  असणार आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अद्यापही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने साथरोग नियंत्रणासाठी 5 ते 15 रुग्ण असणारे प्रतिबंधीत क्षेत्र (मॅक्रो कंटेन्मेंट) आणि 15 पेक्षा जास्त रुग्ण असणार्‍या प्रतिबंधीत क्षेत्रात (मायक्रो कंटेन्मेंट) आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे निर्देश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.  यामध्ये ट्रेसींग, टेस्टींग आणि ट्रिटमेंटवर भर देण्यात येत आहेत. यानुसार मॅक्रो कंटेन्मेंट आणि मायक्रो कंटेन्मेंटमध्ये आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यात येणार असून येथील सर्व नागरिकांना या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. आदेशाची अंमलबजावणी करताना अडथळा आणल्यास त्यांच्या विरोधात साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. वैद्यकीय आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी किंवा प्राधिकृत केलेल्या लॅब टेक्नीशियन यांनी सदर ठिकाणच्या गरजेनुरूप निवडक नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करून सदर नमुने तत्काळ प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवावे, असे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply