Breaking News

मुंबई-पुणे वंदे भारत ट्रेनची चाचणी

कर्जतमध्ये प्रवाशांनी व्यक्त केला आनंद

कर्जत ः प्रतिनिधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडताना मुंबई-पुणेदरम्यान वंदे भारत रेल्वेगाडी चालविण्यात येईल, अशी घोषणा केली होती. पूर्ण वातानुकूलित आणि हायस्पीड ट्रेनसारखा लूक असलेल्या वंदे भारत गाडीची लगोलग पुणे-मुंबईदरम्यान चाचणी घेण्यात आली. मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि पुणे मार्गावरील प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे. या मार्गावर अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या वंदे भारत ट्रेनची गुरुवारी (दि. 2) ट्रायल घेण्यात आली. पुणे ते मुंबई अशी ही गाडी धावल. त्या वेळी कर्जत रेल्वेस्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांना आपण परदेशात आहोत काय असे काही वेळ वाटले. साडेतीन तासांत मुंबई ते पुणे हे अंतर पार करणार्‍या वंदे भारत ट्रेनचा लूक बघून अनेकांनी तोंडात बोट घातले, कारण पूर्णपणे भारतीय बनावटीची असूनदेखील अनोखी अशी ही रेल्वेगाडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ही गाडी बघून सर्व प्रवाशांनी आनंद व्यक्त केला, तसेच या मार्गावरील अनेक गावांतील लोक आणि रस्त्याने जाणारे वाहनचालकदेखील कुतूहलाने गाडीकडे पाहत होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply