Breaking News

पनवेल, नवी मुंबईचे महापौरपद खुल्या वर्गातील महिलांसाठी राखीव

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिकसाठी महापौरपद खुल्या वर्गासाठी राखीव झाल्याने या शहरातील महापौरपदाकडे अनेक इच्छुकांच्या नजरा वळल्या आहेत. त्यामुळे महापौरपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी म्हणून नगरसेवकांकडून आतापासूनच हालचाली सुरू होणार आहेत, तर पनवेल आणि मुंबईचे महापौरपद खुल्या वर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे.

राज्यातील अनेक महापालिकांमधील महापौरपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला होता, मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे सरकारने सोडतीला तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. त्याची मुदत 22 नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. त्यामुळे महापौरपदासाठीची आरक्षण सोडत बुधवारी (दि. 13) काढण्यात आली. त्यात नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, पनवेल, अकोला, चंद्रपूर, भिवंडी आणि जळगाव महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. आरक्षणाच्या सोडती नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply