Breaking News

गुफरान हुसेनने कांस्यपदक जिंकले

पनवेल : वार्ताहर

अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या पनवेल येथील अब्दुल रझ्झाक कालसेकर पॉलिटेक्निकमधील गुफरान खान या विद्यार्थ्याने हरियाणातील पंचकुला येथे आयोजित 19व्या ज्युनिअर अ‍ॅण्ड सिनिअर स्काय नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये यश संपादन केले आहे. गुफरानने मार्शल आर्टमधील अ‍ॅरो स्काय व लोबो कांस्यपदक पटकाविले.

गुफरान हा अब्दुल रझ्झाक कालसेकर पॉलिटेक्निकचा तृतीय वर्ष सिव्हील इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून, यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून 40हून अधिक पदकांची कमाई केली आहे.

या यशाबद्दल अंजुमन-ए-इस्लाम नवी मुंबई शिक्षण संस्थेचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन बुरहान हारिस, कालसेकर टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. अब्दुल रझ्झाक होनुटागी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रमजान खाटीक, सिव्हील इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. इलियास कादरी, तसेच अध्यापक व विद्यार्थी वर्गाने गुफरानचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply