पनवेल : रामप्रहर वृत्त
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात खासदार संभाजीराजे शनिवार (दि. 26)पासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. रायगड जिल्हा पूर्ण ताकदीने संभाजीराजेच्या सोबत आहे. या संदर्भात नियोजनासाठी मंगळवारी (दि. 22) सायंकाळी 5.30 वाजता खालापूर तालुक्यातील दांडफाटा येथील टाकेदेवी मंदिरात मराठा समाजाची बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांपासून राजे समाजाच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात आंदोलन करीत आहेत, तरीही मुख्यमंत्री फक्त आश्वासन देत आहेत. प्रश्न सोडवत नाहीत, म्हणून राजेंना आमरण उपोषण करावे लागत आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी व समाजासाठी लाजिरवाणी आहे. राज्य सरकारने मागण्या मान्य करून अंमलबजावणी नाही केली तर या सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असेही साबळे यांनी म्हटले आहे.
पनवेल : राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे मराठा समाजाच्या वतीने खासदार संभाजीराजे उपोषण करणार आहेत. या उपोषणास करंजाडे ग्रामपंचायतीने पाठिंबा जाहीर केला आहे. पाठिंब्याचे पत्र सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी राज्य समन्वयक विनोद साबळे यांना दिले.