Breaking News

खारघरमध्ये लसीकरण केंद्र सुरू

पनवेल ः वार्ताहर

रोटरी खारघर व मनुस्मृती ज्येष्ठ नागरिक घर यांच्या सहकार्याने पनवेल महानगरपालिकेने रोटरी मनुस्मृती मेडिकल सेंटर खारघरच्या ओवे गाव येथील सेक्टर 30 येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू केले आहे, अशी माहिती रोटरी खारघर मिडटाऊनचे अध्यक्ष कमलेश अगरवाल यांनी दिली. नुकतेच येथे 200 लोकांचे लसीकरण सुरळीतपणे झाले.

दररोज येथे 200-300 लोकांचे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती रोटरी प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. किरण कल्याणकर यांनी दिली. या लसीकरण केंद्राचा खारघरच्या जवळपासच्या लोकांना आणि तळोजातील रहिवाशांना लाभ होईल, असे रोटरी ट्रस्टचे अध्यक्ष शाम फडणवीस यांनी सांगितले. लसीकरण विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी खारघरचे ज्येष्ठ रोटरिअन कमलेश धार्गळकर यांनी केले आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply