तिठ्यावरील शिल्पही ढासळले
रेवदंडा : प्रतिनिधी
येथील आगरकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला तिठा असे संबोधले जाते. या ऐतिहासीक किल्ल्याच्या मोठ्या बंदराकडील प्रवेशद्वाराची पडझड झाली असून, तिठ्यावरील शिल्प (बोधचिन्ह) तुटून खाली पडले आहे.
आगरकोट किल्ला रेवदंडा व कोर्लई जवळील समुद्रात आहे. किल्ल्यामध्ये जाण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात पोर्तुगीजांनी शिल्प कोरले होते. ते इतिहासप्रेमी व पर्यटकांचे लक्ष्य वेधून घेत होते. काही दिवसापुर्वी हे शिल्प तटाच्या भिंतीतून निसटले व तुटून पडले. त्याबद्दल इतिहासप्रेमी मंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे. आगरकोट किल्ल्यातील ऐतिहासीक वस्तू व शिल्पे यांचे जतन करण्याचे दृष्टीने पुरातत्व खात्याने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे.