पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 27) कोरोनाच्या तब्बल 201 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, पाच जणांचा बळी गेला आहे. एका दिवसातील हा नवा उच्चांक आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 88, पनवेल ग्रामीणमधील 31, कर्जत तालुक्यातील 22, उरण व रोहा तालुक्यातील प्रत्येकी 15, अलिबाग व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी आठ, खालापूर तालुक्यातील सात, पेण तालुक्यातील चार, तर मुरूड, श्रीवर्धन व महाड तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृत रुग्ण पनवेल मनपा हद्दीतील तीन आणि उरण व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी एक आहे. दुसरीकडे दिवसभरात 69 रुग्ण बरे झाले. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 3277वर गेला असून, मृतांची संख्या 125 झाली आहे.
Check Also
रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …
RamPrahar – The Panvel Daily Paper