Breaking News

बारणेंच्या प्रचारार्थ रिपाइं (डे) सज्ज -साळुंखे

पनवेल : वार्ताहर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं(डे) आणि मित्रपक्षाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन केले आहे.

त्याचप्रमाणे येत्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांचा प्रचार कऱण्याचे आदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले. त्याचप्रमाणे प्रचार करण्याची यंत्रणा राबविली जाईल व गावागावात तालुक्यात जाऊन श्रीरंग (आप्पा) बारणे यांचा प्रचार केला जाईल व कोणत्याही परिस्थितीत महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनसुद्धा जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिले. विविध ठिकाणी जाऊन  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. या वेळी त्यांच्या समावेत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होेते. या वेळी बोलताना जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरांत पोहोचविणे गरजेचे आहे.

Check Also

तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन

तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …

Leave a Reply