पनवेेल : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार शिगेला पोहाचला असून या प्रचारात महायुतीच्या महिलासुद्धा आघाडी आहेत. प्रत्येक घराघरात जाऊन श्रीरंग बारणे यांचे परिचयपत्र व त्यांचा कार्यअहवाल वाटप करून कोणत्याही परिस्थितीत धनुष्य बाणासमोरील बटन दाबा, असे आवाहन करीत आहेत. शहरातील प्रभाग क्र. 18 येथे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील, भाजप शहर चिटणीस नगरसेवक नितीन पाटील यांच्यासह माजी नगरसेविका नीता माळी, अर्चना कुळकर्णी, गावडे, सुजन मुसलोणकर, मंदार काणे, अभिनव सोमण, प्रवीण अमृते, पिंटू म्हात्रे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महायुतीचे पदाधिकारी घराघरात जाऊन प्रचार करीत आहेत. या प्रचारात महिला आघाडीचा सुद्धा सक्रीय सहभाग असून मोठ्या प्रमाणात महिला प्रचारात उतरल्या आहेत व ते प्रभाग क्र. 18 पिंजून काढत आहेत. याचा फायदा निश्चितच महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना होणार असून प्रचारात महायुतीने घेतलेल्या आघाडीमुळे विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …