Breaking News

इंग्लंडची सेमीफायनलमध्ये धडक; युरो कप स्पर्धेतून बलाढ्य युक्रेन बाहेर

रोम ः वृत्तसंस्था

युरो चषक फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य युक्रेनला बाहेरचा रस्ता दाखवत जोरदार धक्का दिला आहे. या विजयासह इंग्लंडच्या संघाने थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडने उपउपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य जर्मनीलाही धूळ चारत ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. उपउपांत्यपूर्व फेरीत स्वीडनवर अतिरिक्त वेळेत 2-1 अशी सरशी साधत युक्रेनने प्रथमच युरो चषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती, पण युरो कप स्पर्धेतील प्रबळ दावेदार समजल्या जाणार्‍या इंग्लंडने युक्रेनला पराभूत करीत बाहेरचा रस्ता दाखवला. या सामन्यातील विजयासह इंग्लंडच्या संघाने सेमीफायनल प्रवेश मिळवला आहे. आतापर्यंतच्या स्पर्धेत एकही गोल न स्वीकारण्याचा आपला विक्रम अबाधित राखत इंग्लंडने युक्रेनला 4-0असे पराभूत केले. नॉकआऊट स्टेजमध्ये चार गोल डागण्यासाठी इंग्लंडला खूप वेळ वाट बघावी लागली नाही. सामन्याच्या सुरुवातीच्या चौथ्या मिनिटाला कर्णधार हॅरीने संघाचे खाते उघडले. पहिल्या हाफमध्ये इंग्लंडने 1-0 अशी आघाडी कायम ठेवली. दुसर्‍या हाफमध्ये 46व्या मिनिटाला इंग्लडने दुसरा गोल नोंदवला. हॅरी मागुइरे याने गोल डागत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर 50व्या मिनिटाला कर्णधार हॅरी केनने आणखी एक गोल करीत आघाडीत 3-0 अशी भर टाकली. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या जार्डन हँडरसन याने संघासाठी चौथा गोल केला. क्वार्टर फायनलसारख्या मोठ्या स्पर्धेत जार्डनचा हा पहिला आंतरराष्ट्रीय गोल ठरला. 1966च्या फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने 4-2 असा विजय नोंदविला होता.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply