Breaking News

खांदा कॉलनीतील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि दैनिक लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 3) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरास अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत रक्तदान केले. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका सीता पाटील, रूचिता लोंढे, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिटणीस चिन्मय समेळ, सदस्य विवेक होन, विरल चोराणी, कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, उपाध्यक्ष अभिषेक भोपी, सरचिटणीस गौरव कांडपिळे, चिटणीस आयुफ अकुला, सदस्य नितेश घुगे, आत्मनिर्भर भारतचे रायगड जिल्हा संयोजक आकाश भाटी, सहसंयोजक नुतन पाटील, कादिर शेख, शिव तोमर, भाजप सांस्कृतिक व क्रीडा मंडळ सहसंयोजक गणेश जगताप, चंद्रकांत मंजुळे, अनिल कोळी, एमजीएम ब्लड बँक स्टाफ, लोकमत टीम आदी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply