Breaking News

रिटघर हायस्कूलमध्ये विद्यार्थी शुभचिंतन समारंभ उत्साहात

पनवेल ः प्रतिनिधी

रिटघर येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री. भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात 10 वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (दि. 11) शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समारंभास रयतचे जनरल बॉडी सदस्य तथा भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू देऊन त्यांचे अभार मानले. रयत शिक्षण संस्थेचे श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय रिटघर येथे आयोजित कार्यक्रमात 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार्‍या वार्षिक परीक्षांसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा तसेच परीक्षांत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला तसेच दुंदरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश म्हात्रे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना अर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. रिटघर ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुराधा वाघमारे, सदस्या वंदना भोपी, वासुदेव भोपी, धर्मा भोपी, दीपक पाटील, राजेश भोपी, गुरुनाथ उसाटकर, दीपक उलवेकर, प्रल्हाद भोपी, विष्णुशेठ चौधरी, बळीराम भोपी, राजेश भगत, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नाईक मॅडम तसेच शिक्षकवृंद आणि इयत्त 10वी-12वीचे विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply