Breaking News

बांगलादेशमध्ये कारखान्याला भीषण आग; 52 ठार, 50 जण जखमी

ढाका : वृत्तसंस्था

बांगलादेशमधील एका कारखान्याला लागलेल्या भीषण आग लागली. या आगीत होरपळून 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 50 जण जखमी झाले आहेत तर काही जण बेपत्ता असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. आग इतकी भीषण होती की अनेकांनी प्राण वाचवण्यासाठी कारखाना असलेल्या इमारतीमधून उड्या मारल्या, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. राजधानी ढाकाजवळील नारायणगंज जिल्ह्यातील रुपगंजमधील सहा मजली कारखान्याला आग लागली. गुरुवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असल्याचे सांगण्यात आले. कारखाना असलेल्या इमारतीच्या तळ मजल्यावर आग लागली. कारखान्यातील रसायने आणि प्लास्टिकमुळे ही आग इमारतीमध्ये पसरली असल्याचे म्हटले जाते. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण आगीत 52 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जखमी असल्याचे वृत्त ’ढाका ट्रिब्युन’ने दिले आहे. आगीपासून वाचण्यासाठी काही कामगारांनी इमारतीमधून उडी घेतली. आगीची घटना समोर आल्यानंतर कामगारांच्या कुटुंबीयांनी कारखान्याबाहेर गर्दी केली होती. बेपत्ता असलेल्या 44 कामगारांची ओळख पटली असल्याचे वृत्त माध्यमांनी म्हटले आहे. आगीत बचावलेल्या कामगारांनी आणि कुटुंबीयांनी कारखान्याच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केला आहे. आग लागली तेव्हा मुख्य प्रवेशद्वार आणि आपात्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठी असलेला मार्ग बंद होता, असा आरोप काही बचावलेल्या कामगारांनी केला. कारखान्यात अग्निशमन यंत्रणाही नव्हती असा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply