सुधागड : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक प्रादेशिक कार्यालय जव्हार व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत अन्नधान्य वस्तूचे किटवाटप वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ पेण-सुधागड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते पडसरे अश्रम शाळा पडसरे येथे करण्यात आला. सुधागड तालुक्यात यावर्षी अंदाजे पाच हजार आदिवासी कुटुंबियांना प्रत्येकी दरवर्षी चार हजारांची शासकीय मदत मिळणार आहे.
यातील दोन हजार थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. तर दोन हजार रुपयाच्या जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. लाभ मिळवून देताना वस्तू चांगल्या दर्जाच्या व लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी वैयक्तिक लक्ष देण्याच्या सूचना ही आमदार रविशेठ पाटील यांनी आदिवासी सहाय्यक प्रकल्प सहाय्यक अधिकारी यांना या वेळी दिल्या.
आगामी काळात आदिवासींना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी यंत्रणा व मदत उभी करीत असे असून देखील आश्वासन देखील आमदार रविशेठ पाटील यांनी दिले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत आदिवासी प्रकल्प सहाय्यक प्रकल्प अधिकारी अजित पवार यांनी खावटी योजनेसंदर्भात माहिती दिली.
याप्रसंगी कु.जि.आ. सेवामंडळ पालीचे अध्यक्ष रवींद्र लिमये, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, भाजप तालुका संघटन सरचिटणीस सागर मोरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तथा अतोणे सरपंच रोहन दगडे, रायगडभूषण गणेश देशमुख, पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, हमरापूर विभाग अध्यक्ष भरत पाटील, केतन देसाई, प्रसाद लखिमळे, साळवी, प्रभारी मंडळ अधिकारी पेडली जावेद जमादार, प्रभारी तलाटी महागाव अनंता वारगुडे, शिक्षक वृंद कर्मचारी व परिसरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.