उरण : रामप्रहर वृत्त
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. उरण येथील शासकीय धान्य कोठार परिसरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पॉलिथिन, कॅरीबॅग व इतर घनकचरा गोळा केला व परिसराची स्वच्छता केली व जमा झालेल्या कचर्याची नगरपालिका सफाई कर्मचार्यांच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली. स्वच्छता ही सेवा डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम हाती घेण्यात आला महाविद्याचे प्राचार्य प्राध्यापक बळीराम एन. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात प्रा. डॉ. ए. आर. चव्हाण प्रा. मेघा रेडडी, एनएसएस प्रमुख डॉ. दत्ता हिंगमिरे व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.