Breaking News

एक्स्प्रेस वे वर बसला अपघात दहा जण गंभीर जखमी

खोपोली : प्रतिनिधी

खाजगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली बस खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात बसमधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 30) रात्री 1 वाजण्याच्या सुमारास खालापूर हद्दीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार रमेश संभाजी थोरात (रा. कारवे, जि. सातारा) हे त्यांच्या ताब्यातील बस क्रमांक एम एच-01 डीआर-0272 घेऊन मुंबई येथून सांगली येथे जात होते. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर हद्दीत कुंभवली गावानजीक बसच्या पुढील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटल्यामुळे बस अनियंत्रित झाली. द्रुतगती मार्गावर काम सुरू असल्याने लेनच्या खड्ड्यामध्ये बस आदळून अपघात झाला. अपघातामध्ये आकाश गणेश चौगुले (वय 27, रा. भायखळा), विजय पवार (वय 31, रा. गिरगाव), पिंटू कुमार (वय 28, रा. साकीनाका), राजेंद्र यादव (वय 33, रा. साकीनाका), शिवसंत गायकवाड (वय 18), सुशांत गायकवाड (वय 24), भाग्यश्री गायकवाड (वय 27), रूपाली उमेश कांबळे (वय 27, रा. मिरज, सांगली), शिफा शेख (वय 23, रा. मानखुर्द) व एक अज्ञात इसम हे सर्व जखमी झाले. जखमीना तातडीने एमजीएम कळंबोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत बसचालक रमेश थोरात याने अपघाताची खबर खालापूर पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास पोलीस नाईक अमित सावंत करीत आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply