Breaking News

रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

लसीकरणाच्या गर्दीत कोरोना रुग्णाचाही प्रवेश

रेवदंडा : प्रतिनिधी

रेवदंडा व चौल परिसरात कोरोना संसर्ग रोगाचा वाढता प्रादूभाव आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न राबविले जात आहेत, मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाच्या गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला आहे. या लसीकरणाच्या गर्दीत कोरोना रुग्णसुद्धा प्रवेश करत असल्याने कोरोना संसर्ग रोगाचा प्रादूर्भाव कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता जास्त असल्याने नागरिकामध्ये संप्तत प्रतिक्रिया आहे.

रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी मोठी गर्दी होते, लसीकरणासाठी पहाटे 4 वाजल्यापासून रांगा लावल्या जात आहेत, परंतु सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचा दरवाजा बंद ठेवण्यात येत असल्याने मुख्य रस्त्यावर लसीकरणासाठी गर्दी होते. यावेळी शासनाने आवाहन केलेल्या सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजावारा उडाला आहे.

या गर्दीत अ‍ॅटिजन चाचणी करण्यासाठी आलेले कोरोना रुग्णसुद्धा सामील होत असल्याने कोरोना पसरण्याची मोठी शक्यता आहे, मात्र संबंधितांचे याबाबत दुर्लक्ष होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात रेवदंडा पोलिसांचा बंदोबस्त असतो, परंतु सकाळी गर्दीच्या वेळी तेथे पोलीस नसल्याने कोणासही अटकाव होत नाही. रेवदंडा व चौलमध्ये कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव असून सुद्धा स्थानिक ग्रामस्थ याबाबत विशेष काळजी घेत नाहीत असे दिसून येते.

रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नंबरमध्ये असलेले काही महाभाग विनाकारण गोंगाट घालून नर्स, डॉक्टर्स, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी वर्गास त्रास देण्याचा प्रकार करत असतात, कोरोनाच्या कालावधीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकसेवा करत असलेल्या डॉक्टर्स, नर्स व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्गास नाहक त्रास देण्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार केला जातो. याबाबत सुज्ञ नागरिकांनी संप्तत प्रतिक्रिया दिली असून कारवाईची मागणी केली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply