Breaking News

सीकेटी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पदार्पण वर्षानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे जभशिप्र संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्याबरोबरच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सीकेटी महाविद्यालय परिसरात अनिल भगत यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. या वेळी प्राचार्य प्रा. डॉ. वसंत. ज्ञा. बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, वाणिज्य विद्याशाखेच्या प्रमुख डॉ. एलिझाबेथ मॅथ्यूज, कला विद्याशाखेचे प्रमुख डॉ. उद्धव भंडारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, क्रीडा प्रशिक्षक प्रा. विनोद नाईक, परीक्षा नियंत्रक डॉ. सुभाष उन्हाळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार, प्रा. योजना मुनिव, प्रा. आकाश पाटील आदी प्राध्यापक वृंद उपस्थित होते. एनसीसी विभागाच्या कॅडेट्सनी कॅ. डॉ. उद्धव भंडारे व सीटीओ प्रा. नीलिमा तिदार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य दिनानिमित्त संचलन करत ध्वजाला मानवंदना दिली.

त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णोत्तर रौप्य महोत्सवी पदार्पण वर्षानिमित्त तरुण चिकित्सक युवकांमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षातील वाटचालीबद्दल संवेदनांची जाणीव निर्माण करण्यासाठी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयीन स्तरावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अमृतमहोत्सवी पदार्पण वर्षानिमित्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नॅशनल कॅडेट कॉप्स (एनसीसी) यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी कौतुक केले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply