Breaking News

महायुतीच्या सभांचा धडाका

पनवेल : रामप्रहर वृत्त

शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना महायुतीचे मावळ मतदारसंघातील उमेदवार तथा खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी शिवसेना, भाजपमधील प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा शेवटच्या टप्प्यात होणार आहेत. त्यामुळे मावळचे राजकीय रण खर्‍या अर्थाने गाजणार आहे.

– ना. नितीन गडकरी शुक्रवारी मोहोपाड्यात

मोहोपाडा : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी 6 वाजता मोहोपाडा येथील एचओसी मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

या सभेस रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, माजी आमदार देवेंद्र साटम, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, रिपाइं कोकण प्रांत अध्यक्ष, नगरसेवक जगदीश गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत.

– युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज उरणमध्ये

उरण : मावळमधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा सोमवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता उरण शहरातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी शाळा, पेन्शन पार्क येथे होणार आहे.

या सभेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, दिनेश पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply