कल्याण : प्रतिनिधी
केंद्रीय राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके)बाबत मोठे विधान केले आहे. पाकव्याप्त असलेला काश्मीरचा भाग हा सन 2024पर्यंत भारतात येईल, कारण या गोष्टी पंतप्रधान मोदीच करू शकतात, असा आशावाद खासदार पाटील यांनी व्यक्त केला. ते कल्याणमध्ये बोलत होते.
काश्मीरमधील कलम 370 हे विशेष राज्य दर्जाचे कलम आणि 35 ए हे कलम हटवण्यात आले. यानंतर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. विरोधकांच्या या टीकेला प्रत्त्युतर म्हणून पंतप्रधान मोदींनी पी. व्ही. नरसिंह राव यांचा संदर्भ दिला होता. या घटनेची मंत्री पाटील यांनी या वेळी आठवण करून दिली.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …