Breaking News

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला अलिबागमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबाग : प्रतिनिधी

केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला अलिबागमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यानेतृखाली निघालेल्या रायगडमधील जन आशीर्वाद यात्रेस मंगळवारी (दि. 17) अलिबागमधून प्रारंभ झाला. अलिबाग शहरात या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या सोबत परिषदेतील विरोध पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार  प्रशांत ठाकूर, आमदार  रमेश पाटील, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब  पाटील, पनवेल महानगरपालिका गटनेते परेश ठाकूर, चेतन पाटील, अमित जाधव, मिलिंद पाटील, हेमंत दांडेकर, सतीश लेले, उदय काठे, अनुसूचित जाती मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष निलेश महाडिक आदी या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी झाले होते.

सर्वप्रथम अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील  कोविड सेंटरला भेट देऊन तेथे कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.  मच्छिमारांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर हुतात्मा स्तंभ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सरखेल कान्होजी आंग्रे समाधी,  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तसेच संत सेवालाल मंदिर  येथे अभिवादन करण्यात आले. भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये प्रकल्पग्रस्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेथे प्रकल्पग्रास्तांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

दरम्यान, यात्रा सुरू करण्यापूर्वी ना. कपिल पाटील यांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांच्या निवासस्थानी भेट देवून ठाकूर कुटुंबियांचे सांत्वन केले.

आजच्या या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण अलिबाग शहर भाजपमय झाले होते. शहरभर भाजपचे झेंडे झळकत होते. ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या. भारत माता की जयच्या घोषणांनी शहर दुमदमून गेले होते.

अलिबागनंतर ना. पाटील यांनी चरी येथे जाऊन शेतकरी आंदोलनातील व्यक्ती व त्यांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला.  त्यानंतर ही यात्रा पेझारी येथे पोहचली. पेझारी चेक पोस्ट आणि वाशी नाका येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही यात्रा पेणच्या दिशेने रवाना झाली.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply