Breaking News

ठाकरे सरकारची दंडेल शाही

केंद्रीय मंत्री नारायण राणेंसह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

महाड : प्रतिनिधी

कोकणात जनआशीर्वाद यात्रा यशस्वी होत असताना या यात्रेला खिळ बसावी म्हणून महाडमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पाली येथील बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कोकणातील जन आशीर्वाद यात्रेला सुरूवात झाली होती. शांततेच्या मार्गाने चाललेल्या या जनआशीर्वाद यात्रेला जनतेकडून उदंड प्रतिसाद मिळत होता. ही यात्रा कोकणात कमालीची यशस्वी होत असल्याचे पाहून शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली होती. ही यात्रा खंडीत करण्यासाठी ठाकरे सरकारने अखेर बळाचा वापर केला आहे.

ना. राणे यांच्या वक्तव्यावरुन शिवसेनेचे शहर प्रमुख सिद्धेश पाटेकर यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून ना. राणे यांच्या विरोधात भादवी कलम 153 अ(1) (ब) (क), 189, 504, 505 (2), 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाडमध्ये गर्दी जमविणे आणि कोविडविषयक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भाजपचे बिपीन म्हामूणकर, जयवंत दळवी, अक्षय ताडफळे यांच्यासह 40 कार्यकर्त्यांवर भादवी कलम 143, 188, 269, 270, 271 आणि आपत्ती व्यवस्थापन 2005 चे कायदा कलम 51 (ब) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply