Breaking News

जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे नवीन रुग्णालय आता डोलवी येथे खुले

अलिबाग : प्रतिनिधी

जेएसडब्ल्यू फाउंडेशनने डोलवी (ता. पेण) येथे  नवीन 73 खाटांचे जेएसडब्ल्यू संजीवनी मल्टीस्पेशियलिटी हॉस्पिटल उभारले आहे. त्याचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील जनतेला सुलभ आणि परवडणार्‍या गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, हा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदल यांनी या वेळी केले.  

डोलवी येथील जेएसडब्ल्यू संजीवनी मल्टीस्पेशियलिटी हॉस्पिटलमध्ये 10 ओपीडी, आयसीयु आणि आपत्कालीन विभाग, सहा खाटांचे एमसीएच वॉर्ड सोबत एनआयसीयु, 247 रुग्णवाहिका, फार्मसी आणि कॅफेटेरीया अशा सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी औषधे, सर्वसाधारण शस्त्रक्रिया, बालचिकित्सा, कार्डीओलॉजी, ईएनटी, नेत्र, दंतचिकित्सा, स्त्री-रोगतज्ज्ञ आणि अस्थितज्ज्ञ विषयक वैद्यकीय सुविधांची सोय आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply