मुरूड : प्रतिनिधी
मुंबईतील पार्थ फाउंडेशन तर्फे मंगळवारी (दि. 24) मुरूड ग्रामीण रुग्णालयास मास्कचे वाटप करण्यात आले. रुग्णालयातील डॉ. दिव्या सोनम यांनी मास्क स्वीकारले या वेळी कर्मचारीसुद्धा उपस्थित होते.
एकदरा ग्रामपंचायत, भंडारी युवक संघ व शहरातील सर्व दुकानदारांनासुद्धा पार्थ फाउंडेशनने मोफत मास्क वाटप केले असल्याची माहिती राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अजित कारभारी या वेळी त्यांनी दिली.