किरण ठाकूर यांनी समविचारी, समर्पित आणि विकासाभिमुख सहकार्यांसमवेत 1995 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीची स्थापना केली. 31 ऑगस्ट 1995 रोजी एकाच शाखेपासून सुरू झालेल्या लोकमान्य सोसायटीचा गेल्या 26 वर्षांत विस्तार झपाट्याने वाढला आहे. आज कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि दिल्ली येथे 213+ पेक्षा जास्त शाखा आहेत, ज्यात 5500 कोटीपेक्षा जास्त ठेवी आहेत. सुमारे सात लाखांहून अधिक समाधानी ग्राहक ही एक लोकमान्यतेची पावती आहे. स्थानिक व्यवसायांना आर्थिक मदत आणि स्थैर्य प्रदान करण्याच्या मूलभूत उद्देशाने लोकमान्य सोसायटीची सुरुवात करण्यात आली. ज्यामुळे स्थानिक जनतेला कमाई आणि आदरणीय उपजीविकेचे साधन उपलब्ध झाले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीमध्ये 1500 हून अधिक कर्मचारी आहेत.
लोकमान्य समूहाने इतर विविध क्षेत्रांमध्येही प्रवेश केला आहे. लोकमान्य सोसायटी शिक्षण, हॉटेल, रिअल इस्टेट, आरोग्य सेवा आणि विमा या क्षेत्रात कार्यरत आहे.
बँकिंगव्यतिरिक्त लोकमान्य सोसायटी इतर विविध ग्राहक लाभ सेवादेखील देतात, जसे की सेफ डिपॉझिट लॉकर, हेल्थकेअर सर्व्हिसेस, लाइफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स, फॉरेन एक्स्चेंज आणि लवकरच गोल्ड लोन योजना सुरू केल्या जातील. लोकमान्य सोसायटी, भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी), आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, इफ्को-टोकियो, न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय लोम्बार्ड आणि केअर हेल्थ इन्शुरन्सचे कॉर्पोरेट एजंट आहेत.
लोकमान्य समूह सामाजिक उपक्रमांच्या क्षेत्रात नेहमीच अग्रगण्य असतो आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट कार्य करून इतर संस्थांसाठी आदर्श निर्माण केला आहे, लोक कल्प फाऊंडेशन या बॅनरखाली लोकमान्य सोसायटीने बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कणकुंबी वनक्षेत्रातील 32 दुर्गम गावे दत्तक घेऊन विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. या गावांमध्ये शिक्षण, रोजगार आणि आरोग्य सेवा पुरविल्या जातात. लोकमान्य सोसायटी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत असते. लोकमान्य समूहाने विविध राज्यांमधील पूर आणि कोव्हिड 19 साथीच्या रोगासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये मदतीचा हात दिला आहे. रुग्णवाहिका व शववाहिकांच्या माध्यमातून जनतेची मदत केली आहे. पीएम फंड, सीएम फंडला भरघोस मदत करून सामाजिक जबाबदारी लीलया पेलली आहे. रोटरी इंटरनॅशनल, लायन्स इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सेवा संस्थांनाही मदत केली आहे.
श्री. किरण ठाकूर नेहमीच आपल्या सहकार्यांना प्रेरणा देतात आणि जेव्हा जेव्हा ते लोकमान्य सोसायटीच्या ग्राहकांशी संवाद साधतात तेव्हा ते म्हणतात, जिथे इच्छा असेल तिथे मार्ग आहे हे प्रेरणादायी शब्द लक्षात घेऊन, आपण सर्वांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे व आमच्यात आत्मविश्वास निर्माण केला आहे, आम्ही त्याच उत्साहाने, नवीन क्षेत्रांमध्ये पुढे वाढलो आहोत. परस्पर हितसंबंध पुढे नेण्यासाठी आपल्या शुभेच्छा आणि संपूर्ण सहकार्याने आम्ही नक्कीच वाढत आहोत, आम्ही तुम्हाला सातत्यपूर्ण, सुरक्षित, पारदर्शक, विश्वासपूर्ण आणि व्यावसायिक सेवा देऊ, असे मी आपणास खात्रीने सांगत आहे.
26व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून लोकमान्य सोसायटीच्या टिळकवाडी येथील मुख्यालयात 31 ऑगस्ट रोजी श्रीमहालक्ष्मी पूजन कोविडविषयक सर्व सूचनांचे पालन करीत आयोजित करण्यात आले आहे.