Breaking News

गीतेंच्या प्रचारासाठी ‘भावोजी’ मैदानात

पालीमध्ये महायुतीची प्रचार सभा

पाली : रामप्रहर वृत्त : महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेताहेत. आता विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी रायगडची जनता अनंत गीते यांना विक्रमी मताधिक्क्याने पुन्हा एकदा लोकसभेत  पाठविणारच, असा विश्वास शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी पाली येथे व्यक्त केला.

महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी सुधागड तालुक्यातील पाली येथील गांधी चौकात शनिवारी (दि. 20) जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत आदेश बांदेकर बोलत होते. देशात विक्रमी मताधिक्क्याने अनंत गीते विजयी होतील, असा दावा त्यांनी या वेळी केला.

या वेळी केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी मंत्री रविशेठ पाटील, निरीक्षक सुनील नाईक, नाविद अंतुले, जिल्हाप्रमुख किशोर जैन, प्रकाश देसाई, विष्णू पाटील, राजेश मापारा, राजेंद्र राऊत, मिलिंद देशमुख, विनेश सीतापराव, रवींद्र देशमुख, सचिन जवके, उपसभापती उज्ज्वला देसाई, अश्विनी रुईकर आदी मान्यवरांसह रणरणत्या उन्हात तालुक्यातील नागरिक व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 तटकरेंकडून वेगवेगळी आमिषे दाखविली जातील, त्यांना बळी पडू नका. ही लढाई भ्रष्टाचाराविरोधात सदाचाराची आहे. यात सदाचाराचाच विजय होणार, अशी ग्वाही गीते यांनी या वेळी दिली.

गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला कलंकित करण्याचे काम सुनील तटकरे यांनी केले असून, स्वत:च्या गुरूचा विश्वासघात करणार्‍या तटकरेंना 23 तारखेला मतदारच त्यांची जागा दाखवतील, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले  यांनी या वेळी केले.

निवडणुकांच्या वेळीच सुनील तटकरेंना मित्रपक्षांची आठवण येते. अशा कामापुरता मामा असणार्‍या तटकरेंना त्यांच्या स्वकीयांकडूनच दगाफटका होणार असल्याचे माजी मंत्री  रविशेठ पाटील यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply